शिक्षक

शिक्षक 5 सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचा जन्मदिवस, जो भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या डॉ. राधाकृष्णन ह्यांच्यामुळे शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखीत झाले ते स्वतः एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. एक सर्वज्ञ, ज्ञानी, प्रकांड पंडित, जवळपास 14 विविध भाषा फक्त अवगतच नव्हत्या तर त्या भाषेंवर प्रभुत्व होते. डॉ. राधाकृष्णन यांनी 1962 साली राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेण्याआधी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे 'उत्कृष्ट शिक्षक' होते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतात. शिक्षक हा काही फक्त एक पेशा नाही अथवा उत्पन्नाचे साधन म्हणून स्वीकारलेली नोकरी होऊ शकत नाही. शिक्षक होण्यासाठी त्या पेशाची उपजत आवड हवी. विद्यार्थी आणि शिक्षण ह्यातील तो महत्वाचा दुवा आहे. शिक्षक होण्यासाठी एक तळमळ असावी लागते, कुठल्याही स्तरांवर शिकवण्यासाठी एक शिकवण्याची तळमळ हवी. समोरच्या विद्यार्थ्याला शिकवताना त्याला त्या विषयात पारंगत करण्याच्या ध्यासासोबत एक सुजाण नागरिक बनवण्याची भावना जोपासली जाते. पूर्वी शिक्षक स्वतः...