Posts

Showing posts from July, 2023

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

Image
  शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण श्री त्रिविक्रम देव , त्रिभुवनाची जननी | तो हा चक्रपाणी शेंदुर्णीत || सोन नदीच्या काठावर सुंदर पवित्र मंगल असे शेंदुर्णी गांव वसलेले आहे. त्रिविक्रम महाराजांच्या या प्रति पंढरपूरात अनेक साधु संत कडोबा महाराजांसारखे होऊन गेलेत. त्याचप्रमाणे सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव गरूड व काका साहेब साने यासारखी सर्व क्षेत्रातील श्रेष्ठ मंडळी होऊन गेलीत. याच पुण्यकर्म भूमीमध्ये आचार्य बापूसो.   गजाननराव गरुडांचा   जन्म ३ ऑक्टोंबर १९२९ साली    आचार्य बापूसो. गजाननराव गरुड   जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावी झाला. त्यांनी आपल्या स्वतःच्या अलौकीक कर्तृत्वाने महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबडेकर व राजर्षी शाहू महाराज , विठठ्ल रामजी शिंदे , सावित्रीबाई फुले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा प्रयत्न केला . बापूचे वडील स्व. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड हे जळगांव जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले प्रेसिडेंट होते व सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले व शेंदुर्णी को ऑप फ्रुटसेल  सोसा. चे आजन्म अध्यक्ष अस

ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा

 ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा         मुळात पौर्णिमा हा शब्दच किती सुंदर..! पौर्णिमा म्हटलं की आकाशात रात्री तेजानं प्रकाशमान होणारं पूर्ण चंद्रबिंब आपल्यासमोर येतं . त्या प्रकाशात मनाला शांतता देणारी एक प्रकारची शीतलता असते. ' चंद्र व्हा हो पांडुरंगा , मन करा थोर, पौर्णिमेच्या चांदण्याला भुकेला चकोर...' जसा चंद्राच्या चांदण्याला चकोर भुकेला असतो, तसाच सद्गुरूंच्या कृपेसाठी शिष्यही भुकेला असतो. सद्गुरू मग आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी चंद्र होतात. पांडुरंग तर ते प्रत्यक्ष असतातच. आपल्या संस्कृतीत गुरूंना देव म्हणण्याची पद्धत आहे. नुसते ' गुरु ' न म्हणता आपण आदराने त्यांना गुरुदेव म्हणतो, आचार्यदेव म्हणतो. एवढा गुरूचा महिमा आहे. संत कबीर तर गुरूंना देवापेक्षाही महान मानतात. ते म्हणतात गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी, जो गोविंद दिजो बताय. एकाच वेळेला समोर सद्गुरू आणि परमेश्वर असे दोघेही उभे राहिले, तर मी आधी सद्गुरुंच्या पायी लागेन. कारण परमेश्वराचे दर्शन घडवणारे सद्गुरू आहेत. असे म्हणतात की एखादया वेळी देव कोपला तर सद्गुरू सांभाळून घेतात