Posts

Showing posts from August, 2023

ये राखी बंधन हैं ऐसा...

Image
ये राखी बंधन हैं ऐसा... मंडळी, सध्या online चा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट online मागवता येते. आज नवीन वाटणाऱ्या गोष्टी उद्या जुन्या होतात. पण काही गोष्टी या चिरंतन टिकून राहतील त्यातीलच एक म्हणजे रक्षाबंधनाची परंपरा. अगदी बारीकसारीक गोष्टीही ऑनलाईन मागवणारी मंडळी आहेत. तशीच ते राखीही ऑनलाईन मागवू शकतील. पण त्यामागील बहिणीचे प्रेम नाही मागवता येणार. ‘ ये राखी बंधन है ऐसा...’ राखी म्हणजे तसा दिसायला एक रेशमी धागा. पण त्यामागची भावना किती श्रेष्ठ ! राखी म्हणजे रक्षण. राखीचा पवित्र धागा अशा काही बंधनात बांधतो की हे बंधन दिसत नाही. राखी भलेही तुटेल पण त्यामागची भावना, प्रेम अबाधित राहते. एक अदृश्य बंधन भावाबहिणींना बांधून ठेवते.      वर्षाच्या ३६५ दिवसातले ३६३ दिवस तुमचे पण दोन दिवस बहिणीचे. एक राखी पौर्णिमा आणि दुसरा भाऊबीज. भाऊ आणि बहिण यांचे नाते सगळ्या सीमारेषा पार करून जाते. जाती, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांना ओलांडून ते जाणारे आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हा सण आहे. बहिण आपल्या संसारात रमलेली असते. तिचे एक नवीन विश्व तयार झालेले असते. त्या विश्वात ती वर्षभर गर्क असते. मुलेबाळे, स

सारे जहाँ से अच्छा...

 *सारे जहाँ से अच्छा...* आपल्या साऱ्यांचे हे भाग्य आहे की, या भारतभूमीत आपला जन्म झाला. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आदी नद्यांच्या जलाने पावन झालेला हा प्रदेश हिमालयाचा रुपेरी मुकुट या भारतमातेने परिधान केला आहे. सागर तिच्या पायाला स्पर्श करतो आहे. कन्याकुमारी येथे तिन्ही सागरांचं जल एकमेकांत मिसळलेले आपणास दिसतं. त्या समुद्रात जो खडक आहे. ज्यावर स्वामी विवेकानंद बसले होते, त्या खडकावर सागराच्या लाटा सतत येऊन अभिषेक करीत असतात. जणू सागराचीही देशभक्ती उचंबळून येते आणि लाटांच्या रूपात तो भारतमातेला जलाभिषेक करतो. तिथूनच स्वामी विवेकानंदांना प्रेरणा मिळाली. आपलं जीवनध्येय गवसलं. सागराची हाक आणि रामकृष्ण कापरमहंसांचे आशीर्वाद यांचा संगम झाला आणि नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांत झालं. भारतीय संस्कृती जगाला कळली, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने. याच विवेकानंदांनी 'देश हाच आपला देव आहे. त्याचीच पूजा करा असा प्रेरणादायी संदेश तरुणांना दिला. इंग्लंडमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हृदय मातृभूमीच्या आठवणीनं उचंबळून आलं. सागराच्या सान्निध्यात बसले असताना त्यांच्या ओठी शब्द आले,