Posts

Showing posts from July, 2024

रयतेच्या राजाचे शेती विषयक धोरण

        L छत्रपती शिवाजी राजे अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी होते. त्यांनी अशक्य कार्य शक्य केले. अनेक शत्रूंचा पराभव केला. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव बाळगला नाही. आपल्या विरोधकांच्या धर्माचा, धर्मग्रंथांचा, धर्मस्थळांचा आणि महिलांचा नितांत आदर केला. शिवरायांचा इतिहास हा केवळ ढाल तलवार आणि लढाया या पुरता मर्यादित नाही, तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले. लोक कल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते. आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण ते कटाक्षाने राबवत असत. आज आपण दुष्काळाच्या झाडा अनुभवत आहोत. पाणीटंचाईचा सामना करत आहोत; पण शिवकाळात देखील दुष्काळ होता, गरीबी होती, जलसिंचन अत्यल्प होते; पण उल्लेखनीय बाब म्हणजे असे असूनही शिवकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. असे का घडले? याचे कारण शिवरायांचे शेती शेती विषयक असणारे धोरण होय.      शिवाजी राजांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही आणि व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासणारे होते, आपल्या राज्याती