रयतेच्या राजाचे शेती विषयक धोरण

        L छत्रपती शिवाजी राजे अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी होते. त्यांनी अशक्य कार्य शक्य केले. अनेक शत्रूंचा पराभव केला. त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव बाळगला नाही. आपल्या विरोधकांच्या धर्माचा, धर्मग्रंथांचा, धर्मस्थळांचा आणि महिलांचा नितांत आदर केला. शिवरायांचा इतिहास हा केवळ ढाल तलवार आणि लढाया या पुरता मर्यादित नाही, तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले. लोक कल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते. आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, असे धोरण ते कटाक्षाने राबवत असत. आज आपण दुष्काळाच्या झाडा अनुभवत आहोत. पाणीटंचाईचा सामना करत आहोत; पण शिवकाळात देखील दुष्काळ होता, गरीबी होती, जलसिंचन अत्यल्प होते; पण उल्लेखनीय बाब म्हणजे असे असूनही शिवकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. असे का घडले? याचे कारण शिवरायांचे शेती शेती विषयक असणारे धोरण होय. 

    शिवाजी राजांचे शेतकरी धोरण हे भांडवलशाही आणि व्यापारशाहीला पूरक नव्हते, तर ते सामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासणारे होते, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाची इजा पोहोचणार नाही, याची खबरदारी शिवरायांनी घेतली.

     छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते कि ‘शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी' छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे कल्याण करत त्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजे म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती लवकरच येत आहे तर आपण जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतीविषयक धोरण.छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्यांच्या रयतेच्या समस्यांची जाण होती. त्यांची भूमिका होती कि शेतीबद्दल चे जे चित्र आहे ते बदलले पाहिजे त्यासाठी ती नेहमी आग्रही होते. आपल्याला माहीतच आहे कि छत्रपती शिवाजी महाराज हे ५० वर्ष जगले आणि त्यांनी स्वतःचे एक विश्व् निर्माण केले त्यासोबत भविष्यातील पिढ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला.आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या स्वरूपाचे बनले आहे, काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराज कृषी धोरणातूनच सापडतात.परंतु आपले दुर्दैव आहे कि जगासमोर त्यांचे शेतीविषयक विचार समोर जाण्यास आपण कमी पडलो.

      छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेतील समाजव्यवस्थेची जाण होती, तितकेच शेतीबद्दल भान होते.शेतीचे चित्र बदलले पाहिजे,याबाबत ते आग्रही होते. महाराज जमतेम ५० वर्षे जगले.त्या जगलेपणात त्यांनी स्वतःचे विश्व तर निर्माण केले होतेच शिवाय इतिहासासमोर एक नवा आदर्श निर्माण केला होता.

    भारत हा शेतीप्रधान देश समजला जातो.सध्या शेतीतील प्रश्न भयावह स्वरूपाचे बनले आहेत. काही प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणातून सापडतात.त्यांचे ग्रामीण समाज व शेतीबाबतचे विचार आजही फारसे समोर आले नाहीत,हे आमचे दुर्दैव. १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव जाणते राजे होते की त्यांच्या रयतेतील प्रजा सुखी होती, आनंदी होती.  शेती हे रयतेचे मुख्य बलस्थान होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती. शेती हे केवळ उपजिविकेचे साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी'हे सूत्र महाराजांना समजले होते.त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन रयतेला मजबूती देणारा होता.

महाराजांचे समकालीन महापुरुष संत तुकाराम अभंगात म्हणतात,

"मढे झाकूनिया करती पेरणी”

      त्या काळात शेतीला किती महत्त्व होते,हे लक्षात येते. रयतेच्या रक्षणासाठी घरातला एक मावळा जर कामी आला तर त्याचे मढे झाकून काळ्या आईची ओटी भरली पाहिजे, अशी पध्दत होत.

        पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी सज्ज होत त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे.कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण एके ठिकाणी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची ३ वेळा मोजणी करण्यात आली.

        शेती करणे हे रयतेचे मुख्य बलस्थान आहे ते त्यांनी जाणले होते.संपूर्ण प्रजेचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे याची महाराजांना जाणीव होती.शेती हे केवळ जीवनावश्यक साधन नसून,रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे. शेती पिकले तर रयत सुखी,रयत सुखी तर राजा सुखी'हे सूत्र महाराजांना समजले होते. पेरणीचे कामे आटोपल्यावर संरक्षणासाठी रयत सज्ज होत त्याकाळी नांगरणी,कुळवणी व नुसत्या शेणखतावर शेती पिकत असे. बिघा,पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत.तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केल ,यालाच पीक पाहणी असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे.ब्रिटिश शासनाने या पद्धतीची नकल केली आहे.कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे अस्मानी संकट रयतेवर कोसळत असत. त्यामुळे महाराजांनी कधीच सारा वसुल केला नाही. प्रजेची,शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकार,व व्यापाऱ्यांना त्यांनी समज दिला होता, याची माहिती काही ऐतिहासिक पत्रांतून मिळते.

Comments

Popular posts from this blog

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

आनंदाची गुढी