शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण

शेंदुर्णी संस्थेचे ७९ व्या वर्षात पदार्पण श्री त्रिविक्रम देव , त्रिभुवनाची जननी | तो हा चक्रपाणी शेंदुर्णीत || सोन नदीच्या काठावर सुंदर पवित्र मंगल असे शेंदुर्णी गांव वसलेले आहे. त्रिविक्रम महाराजांच्या या प्रति पंढरपूरात अनेक साधु संत कडोबा महाराजांसारखे होऊन गेलेत. त्याचप्रमाणे सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव गरूड व काका साहेब साने यासारखी सर्व क्षेत्रातील श्रेष्ठ मंडळी होऊन गेलीत. याच पुण्यकर्म भूमीमध्ये आचार्य बापूसो. गजाननराव गरुडांचा जन्म ३ ऑक्टोंबर १९२९ साली आचार्य बापूसो. गजाननराव गरुड जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावी झाला. त्यांनी आपल्या स्वतःच्या अलौकीक कर्तृत्वाने महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबडेकर व राजर्षी शाहू महाराज , विठठ्ल रामजी शिंदे , सावित्रीबाई फुले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा प्रयत्न केला . बापूचे वडील स्व. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड हे जळगांव जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले प्रेसिडेंट होते व सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले व शेंदुर्णी को ऑप फ...