ये राखी बंधन हैं ऐसा...
ये राखी बंधन हैं ऐसा... मंडळी, सध्या online चा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट online मागवता येते. आज नवीन वाटणाऱ्या गोष्टी उद्या जुन्या होतात. पण काही गोष्टी या चिरंतन टिकून राहतील त्यातीलच एक म्हणजे रक्षाबंधनाची परंपरा. अगदी बारीकसारीक गोष्टीही ऑनलाईन मागवणारी मंडळी आहेत. तशीच ते राखीही ऑनलाईन मागवू शकतील. पण त्यामागील बहिणीचे प्रेम नाही मागवता येणार. ‘ ये राखी बंधन है ऐसा...’ राखी म्हणजे तसा दिसायला एक रेशमी धागा. पण त्यामागची भावना किती श्रेष्ठ ! राखी म्हणजे रक्षण. राखीचा पवित्र धागा अशा काही बंधनात बांधतो की हे बंधन दिसत नाही. राखी भलेही तुटेल पण त्यामागची भावना, प्रेम अबाधित राहते. एक अदृश्य बंधन भावाबहिणींना बांधून ठेवते. वर्षाच्या ३६५ दिवसातले ३६३ दिवस तुमचे पण दोन दिवस बहिणीचे. एक राखी पौर्णिमा आणि दुसरा भाऊबीज. भाऊ आणि बहिण यांचे नाते सगळ्या सीमारेषा पार करून जाते. जाती, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांना ओलांडून ते जाणारे आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा हा सण आहे. बहिण आपल्या संसारात रमलेली असते. तिचे एक नवीन विश्व तयार झालेले असते. त्या विश्वात ती वर्षभर गर्क असत...