बाप ओळखता... येत नसतो
बाप ओळखता... येत नसतो कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो कधी बाप रागामुळे वाईट असतो धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो... अज्ञातलाच बाप सर्वांना माहित असतो पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे ही ऐकून घेतो... आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी ऐकटा बापच वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभ करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो.. रागामागे मुलांच सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो घडवण्याच काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते बापाला थकण्याची ही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण ऐक दिवस म्हतारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो. नाहीतर अंगणातल्या झाडाखाली ऐकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो अश्रू दिसू देत नसतो. तो मनातलही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो.